Skip to content

Latest

More results

कृपया लक्षात ठेवा की तुमच्या देशात टेक्स्ट आणि/किंवा व्हॉइस चॅट सुविधा कदाचित डिसेबल केलेली असू शकते. व्हिडिओ चॅट कोणत्याही ठिकाणी उपलब्ध नाही.

समुदाय मानके

Roblox मध्ये, आमचे ध्येय अब्ज लोकांना सकारात्मकता आणि सभ्यतेने जोडणे हे आहे. आम्ही प्रत्येकासाठी सुरक्षित आणि स्वागतार्ह वाटेल असा समुदाय निर्माण करण्यासाठी कठोर परिश्रम घेत आहोत; एक असे ठिकाण जिथे तुम्ही स्वतःचे अस्तित्व जपू शकता, सकारात्मक संबंध निर्माण करू शकता आणि तुमच्या सर्जनशीलतेला मुक्त वाव देऊ शकता. आमची समुदाय मानके हे सुनिश्चित करण्यासाठी आहेत की, एक्सप्लोर करत असताना प्रत्येकाला आपलेपणा आणि सुरक्षित वाटेल. आमच्या 'समुदाय मानकांच्या युवा मार्गदर्शकासाठी', येथे पहा.

येथे Roblox नियमांच्या लवचिकतेबद्दल सांगत आहे. मराठी भाषांतर आमचा समुदाय सतत वाढत आहे आणि बदलत आहे, त्यामुळे आम्हीदेखील सातत्याने नवनवीन गोष्टी शिकत आहोत; याचाच अर्थ असा की आमची मानके देखील काळानुसार बदलू शकतात. आम्ही प्रत्येकाला नेहमीच एकमेकांशी दयाळूपणे आणि आदराने वागण्याची विनंती करू; अगदी तसंच, जसं तुम्ही प्रत्यक्ष आयुष्यात एकमेकांशी वागता. जर आम्हाला असे आढळले की काही युजर्स किंवा मजकूर या नियमांचे उल्लंघन करत आहेत, तर आम्ही त्या मजकुरावर आणि तो तयार करणाऱ्यांच्या खात्यांवर कडक कारवाई करू. ज्या प्रकरणांमध्ये एखाद्या व्यक्तीची प्रत्यक्ष जीवनातील सुरक्षितता धोक्यात असेल, तिथे आम्ही सर्वांना सुरक्षित ठेवण्यासाठी संबंधित अधिकार्‍यांशी मिळून काम करू.

आम्हाला ठाऊक आहे की आम्ही परिपूर्ण नाही, आणि आमचे सर्वतोपरी प्रयत्न करूनही, कधीकधी काही गोष्टी आमच्या नजरेतून सुटू शकतात. जर तुम्हाला कधीही असे काही आढळले जे या नियमांचे उल्लंघन करत आहे असे तुम्हाला वाटते, किंवा ज्यामुळे तुम्हाला असुरक्षित वाटत असेल, तर कृपया आम्हाला कळवण्यासाठी आमच्या 'गैरवर्तनाची तक्रार नोंदवा' या साधनाचा वापर करा. आपण सर्व यामध्ये एकत्र आहोत, आणि तुमची भूमिका आम्हाला हे असे ठिकाण बनवण्यात मदत करते ज्याचा आपल्या सर्वांना अभिमान वाटेल. जर तुम्हाला यातील अधिक औपचारिक कायदेशीर बाजू जाणून घ्यायची असेल, तर आमच्या वापराच्या अटी तुम्ही केव्हाही वाचू शकता.

सुरक्षितता

सुरक्षिततेला आम्ही आमच्या प्रत्येक कामात सर्वोच्च प्राधान्य देतो. आम्ही शोषण, भेदभाव, छळ, दादागिरी किंवा अशा कोणत्याही वर्तणुकीला किंवा कंटेंटला परवानगी देत नाही ज्यामुळे इतरांना असुरक्षित किंवा अस्वागतार्ह वाटेल. विशेषतः, आम्ही — प्रतिबंधित करतो

सभ्यता

सभ्यता हा Roblox समुदायाचा गाभा आहे. सभ्य वातावरणाला प्रोत्साहन देण्यासाठी, Roblox विशिष्ट प्रकारच्या मजकुरास प्रतिबंधित करते, ज्यामध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे;

सचोटी

आमची अशी इच्छा आहे की आमच्या युजर्सनी एकमेकांवर विश्वास ठेवावा, जेणेकरून ते न्याय्य आणि प्रामाणिकपणे खेळू शकतील आणि एकमेकांच्या सर्जनशीलतेचा व मेहनतीचा आदर करू शकतील. याला प्रोत्साहन देण्यासाठी, आम्ही खालील गोष्टींना प्रतिबंधित करतो किंवा त्यावर मर्यादा घालतो;

सुरक्षा

आमच्या समुदायाची भरभराट होण्यासाठी, प्रत्येकाला शारीरिक सुरक्षिततेप्रमाणेच डिजिटलदृष्ट्याही सुरक्षित वाटणे आवश्यक आहे. हा विभाग खेळाडूंनी आणि क्रिएटर्सनी इतरांच्या माहितीशी कसे वागावे आणि स्वतःची तसेच इतरांची डिजिटल सुरक्षा कशी राखावी, याचे वर्णन करतो.

Roblox तुमची वैयक्तिक माहिती कशा प्रकारे हाताळते, याबद्दलच्या माहितीसाठी कृपया गोपनीयता धोरणाला भेट द्या. तुमचे खाते सुरक्षित कसे ठेवावे - ज्यामध्ये टू-स्टेप व्हेरिफिकेशन सारखी अतिरिक्त सुरक्षा फिचर्स कशी सुरू करावीत याचा समावेश आहे - याबद्दल अधिक माहितीसाठी येथे आमच्या मदत पृष्ठाला भेट द्या. थर्ड पार्टी ॲप डेव्हलपर्स आणि त्यांच्या वापराबाबत अधिक माहितीसाठी; आमच्या क्रिएटर थर्ड पार्टी ॲप धोरणाला येथे भेट द्या.

एक सुरक्षित मेटाव्हर्स राखण्यात मदत करण्यासाठी, Roblox खालील गोष्टींना परवानगी देत नाही:

अधिक संसाधने